मुंबईहून सिंधुदुर्गला विमान प्रवाशांना घेऊन गेलं, आकाशात दोन घिरट्या घातल्या अन्…

मुंबईहून सिंधुदुर्गला गेलेलं विमान चिपी विमानतळावर लॅण्ड न होताच पुन्हा मुंबईला परतलं. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विमानाने आकाशात दोन वेळा घिरट्या घातल्या आणि मुंबईत माघारी आलं. चिपी विमानतळावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

तर चिपी विमानतळावर मुंबईला जाण्यासाठी ४० प्रवाशी वाट तात्कळत होते. मात्र सिंग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानसेवा रद्द झाली. त्याची अडचण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा 1 सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले होते.  त्यानुसार विमानसेवा सुरु करण्यात आली होती.