इचलकरंजी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील अवस्था अत्यंत दयनीय आहे. महापालिकेकडे असणारे अपुरे मनुष्यबळ व नागरिकांच्याकडून होणारा गैरवापर यामुळे शहरातील शौचालय अस्वच्छ व दर्गंधीयुक्त बनलेली आहे. त्यामुळे शहरांमध्ये स्वच्छ सुंदर व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये ई टॉयलेट बसवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे.
यासाठी शासनाकडून जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून ई टॉयलेट उभारणीसाठी निधी उपलब्ध देखील झालेला आहे. सदर निधीतून प्रत्येकी 13 लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक सुविधा व स्वयंचलित यंत्रणा असणारे ईटॉयलेट उभारण्यात येणार आहेत.