राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले आहेत.या अर्जदार महिलांना आता पात्रता यादीची प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे? हे जाणून घेऊयात.
कुठे पाहाल यादी?
लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे. प्रत्येक गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत. त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचणा दरम्यान हजर राहावे लागणार आहे.