निशिकांत भोसले – पाटील यांच्या सहकार्यातून पाण्याची व्यवस्था….

वारणा आणि कृष्णा नदीला महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने पिण्याचा
गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना बंद झालेल्या आहेत. यामुळे दुधगाव, कवठेपिरान, वाळवा तालुक्यातील शिगाव, कारंदवाडी गावामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप व निशिकांत पाटील फाउंडेशनच्यावतीने मिरज तालुक्यातील दुधगाव, कवठेपिरान, तसेच वाळवा तालुक्यातील शिगाव, कारंदवाडी या गावांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवामोर्चाचे वाळवा तालुकाध्यक्ष प्रवीण माने यांच्या प्रयत्नातून टँकरने मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी तत्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. शिगाव येथे निवास पाटील, कारंदवाडी येथे संदीप सावंत, उपसरपंच रूपाली सावंत, कवठेपिरान येथे शुभम पाटील, दुधगाव येथे बाबासाहेब सांद्रे, चेतन पवार यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.