राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रात येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होणार असून राज्य निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरपर्यंत आहे.
याआधीही 288 सदस्य निवडले जाणार आहेत. महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान निवडणुका होऊ शकतात असा अंदाज आहे.