वाळवा तालुक्यातील बावची कोकाटे पाणंद रस्त्यास आ. सदाभाऊ खोत यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक नियोजनातून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे सागर खोत यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना सागर खोत यांना बावचीचे ऋषिकेश कोकाटे यांनी या पाणंद रस्त्याची दुरावस्था दाखवली होती. शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा खोत यांच्यासमोर मांडल्या. त्या शेतकऱ्यांना सागर खोत यांनी पाणंद रस्त्याचे काम करून देईन असा शब्द दिला होता.
या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची अतिशय बिकट अवस्था होता होती. पावसाळ्यात सुमारे श किलोमीटर अंतरावर गाडी लावून पुढे चालत जावं लागत होते. त्या पानंद रस्त्यास ५० लाख रुपयाचा निधी सदाभाऊंच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. पावसाळा झाल्यानंतर पाणंद सत्याचे काम होईल. नक्कीच पुढील वर्षो शेतकऱ्यांना तिथे डांबरी रस्ता उपलब्ध करून देणार असल्याची याही सागर खोत यांनी दिली.