गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही गावं पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून ‘धर्मवीर – 2’ च्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली होती. आधी हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या होता पण चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार यांनी सगळी परिस्थिती पाहता प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली.
त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सगळीकडे कौतुक करण्यात आले होते. सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून दीड महिन्याचा अवधी घेऊन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता 27 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली.
प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत होती, अनेक ग्रुप बुकिंगसाठी थांबलेले होते, परदेशातून प्रदर्शनासाठी विचारणा होत होती, सोशल मीडियावरही चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याची विचारणा अनेकजण करत होते. आता प्रेक्षकांना चित्रपटासाठी केवळ 27 सप्टेंबर पर्यंत अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. चित्रपटाची तारिख पुढे ढकलण्यावर निर्माते मंदेश देसाई म्हणाले होते की गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे.
राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता ‘धर्मवीर – 2’ हा चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू असे सांगितले होते.