पेठवडगावच्या महालक्ष्मी तलाव साफ-साफाईची मागणी! अन्यथा तीव्र आंदोलन.…..

गेल्या चार-पाच वर्षात तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व रहिवास क्षेत्र पाणलोट क्षेत्रात बांधकामे होत आहेत. यामध्ये कुरण्यातील अंबाबाई मंदिर परिसरात होत असलेल्या औद्योगिक व सांडपाणी थेट तलावातील ओढ्यात येत आहे. येथे ट्रिटमेंन्ट प्लॅन्ट दाखवण्या पुरता बसवलेला आहे. येथे यामुळे थेट पाणी तळ्यात मिसळत आहे. याच पध्दतीने संभापुर रोडला डीएन विंड समोर बालाजी पार्क मध्ये प्लॉट पाडून विकले आहेत.

या ठिकाणी रहिवास वसाहत विकसित होत आहे. याचे सांडपाणी चौगुले मळा परिसरातुन ओढ्यात सोडले आहे. याबरोबरच हॉटेल, दुकाने, फार्महाउस बांधलेली आहेत. याबाबतीत गेली तीन वर्षे जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करुन सुध्दा प्लॉटिंगसाठी, औद्यागिकरणासाठी कसे परवाने दिले गेले यांची चौकशी करावी अशी मागणी करताना त्यांनी पावसाळ्यापुर्वी पालिका प्रशासनाने ओढ्याची साफ-साफाई योग्यपध्दतीने केलेली नाही.

यामुळे या परिसरातील शेतीला धोका निर्माण झाला आहे.पेठवडगावचा शाहूकालीन महालक्ष्मी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या बांधकाम,औद्योगीक वसाहतीमधील प्रदूषित सांडपाणी ओढ्यातून तलावात येत आहे. वडगावच्या नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होण्याअगोदर प्रशासनाने पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिला.