सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ असून त्यातील बार्शीसह जिल्ह्यातील सहा मतदारसंघात (माळशिरस, पंढरपूर-मंगळवेढा, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट) भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी (माढा व मोहोळ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सांगोल्यात एकमेव आमदार आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे अपक्ष असून शहर मध्य विधानसभेच्या आमदार प्रणिती शिंदे आता खासदार झाल्या आहेत. या सर्व मतदारसंघांची सद्य:स्थिती व संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन दक्षिण सोलापूर, शहर मध्य, माळशिरस, शहर उत्तरसह इतरही काही मतदारसंघांमध्ये मनसे मोठ्या ताकदीने मैदानात उतरण्याची शक्यता आहे.