सांगोला मतदारसंघातील जनतेकडून आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे होत आहे कौतुक…..

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नुतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मागील दोन दिवसापासून नागपूर येथील हिव ाळी अधिवेशनाचा सांगोला मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम नवनियुक्त आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे कडून सुरू आहे. सांगोला मतदार संघातील विविध विकासकामांची मुद्देसुर मांडणी करीत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचेकडून विविध विकास कामांची मागणी केली जात आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नुतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दुसर्या दिवशीही  प्रश्न मांडण्याची संधी मिळाल्यानंतर आणि प्रलंबित आणि महत्त्वाच्या प्रश्नावर आवाज उठविला आहे. सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील थकीत चारा छावणीची बिले ताबडतोब द्यावीत माणदेश पट्टामधील तेल्या रोगामुळे नुकसान झालेल्या बागासाठी पुन्हा लागवड करण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, शेतकरी- पशुपालक दुध धंद्याकडे वळालेले आहे, गाईच्या दुधाला प्रतिलीटर ४० /- रुपये दर द्यावा, दुध दराबाबत जाच अटी शिथील कराव्यात व अनेक सुतगिरण्याच्या जाचक अटी शिथील कराव्यात या प्रश्नावर आवाज उठविला आहे. या विकासकामांची मागणी विधीमंडळामध्ये केली.

आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रचारादरम्यान मतदारांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण मांडणी ते विधिमंडळात करत आहेत. आमदाराकडून सर्वसामान्य जनतेच्या व जनतेशी जिव्हाळ्याचे निगडित असणारे प्रश्न मांडले जात असल्यामुळे सांगोला मतदारसंघातील जनतेकडून आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे कौतुक होत आहे.