वारकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सांगोला मतदारसंघातुन गणपतराव देशमुख तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते . तब्बल 55 वर्ष त्यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं . स्वर्गीय मा .गणपतराव देशमुख म्हणजेच उर्फ आबासाहेब यांचं जीवन आणि कार्य या चित्रपटातुन उलगडणार आहे .दमदार स्टारकास्ट असलेला कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट 25 ऑक्टोबरला मराठी व हिंदी भाषेत जगभर रिलीज होत आहे.
या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच लॉंच करण्यात आले आहे. चित्रपटात अनिकेत विश्वासराव स्वर्गीय. गणपतराव देशमुख यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आबासाहेब यांनी राज्याच्या राजकारण, समाजकारणात महत्त्वाचे योगदान दिलं. तब्बल अकरा वेळा ते आमदार झाले त्या दोन वेळी कॅबिनेट मंत्रीपद भूषवण्याची संधी त्यांना मिळाली .प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजासाठी योगदान देणाऱ्या,आपल्या भागाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या ,शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा वेध चित्रपटात घेण्यात आला आहे. त्यामुळे आबासाहेबांनी चित्रपटातून पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता 25 ऑक्टोबरपर्यंत थांबावं लागणार आहे.