मुंढेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी गणेश कोळी याची बिनविरोध निवड

अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी गणेश कल्लप्पा कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच बापूराव पाटील यांनी राजीनामा दिल्याने ही करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आले यावेळी ही निवड करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच बापूराव पाटील ग्रामपंचायत सदस्य ज्योती कोळी सुरेश कोळी सुरेखा माळी सोनाली पवार धानव्वा स्वामी सचिन गायकवाड आप्पाशा अंकोशे मळसिद्ध दस्तापुरे महेश सोलापूरे आणप्पा कोळ शिवानंद गंदगे दरेप्पा अरवत राजकुमार सोलापूरे मल्लिनाथ कोळी राजकुमार कोळी ग्रामसेवक सचिन गायकवाड तलाठी महेश राठोड नागनाथ शिंदे अक्षय गंदगे आदी उपस्थित होते निवडीनंतर सरपंच कोळी यांचा माजी सरपंच बापूराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच कोळी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शासकीय निधीतून गावाचा विकास करणार असल्याचे सांगितले. निवडीबद्दल आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी कोळी यांचे अभिनंदन केले आहे.