तापमानातील बदलानुसार आहारात बदल करणं आवश्यक आहे. पावसाळ्यात नेमका डाएट कसं सांभाळावं हा प्रश्न सर्रास प्रत्येकाला पडतो. पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार उद्भवतात त्यामुळे आपले आरोग्य सांभाळणे हे खूपच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये पावसाळ्यात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया…..
कोबी, फ्लॉवर टाळा
पावसाळ्यातील भाज्या कोणत्या खाव्यात हा प्रश्न पडणं साहजिक आहे. पावसाळ्यात शक्यतो काकडी, मुळा, भेंडी, तोंडली, गाजर ,बीट यांचे आहारातील प्रमाण वाढवावे.
मक्याचे कणीस
पावसाळा आणि मक्याचे कणीस यांचं जवळच नातं आहे. उकडलेल्या मक्याच्या दाण्यासोबत एक वाटी उकडलेली कडधान्ये जरूर खावीत. मक्याचे भाजलेले कणीस खाताना अतिरिक्त मीठ आणि मसाले टाळावेत.
तळलेले पदार्थ, सूप आणि भाजी
पावसाळा आणि मक्याचे कणीस, भजी यांचे वेगळे नाते जनमानसात रुजलेले आहे. एखाद्या दिवशी तळलेल्या पदार्थांचा बेत असेल तर मुळात प्रमाणात खाणं आणि पुढच्या जेवणात भाज्यांचं सूप किंवा भरपूर भाजी असणारा आहार घेणं महत्वाचं आहे.