आजच्या काळात मोबाईल आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. ऑफिसचे काम असो, ऑनलाईन शिक्षण असो किंवा मनोरंजन दिवसातील बराच वेळ मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहण्यात जातो. पण यामुळे डोळ्यांवर ताण येतो, दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो आणि डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे मोबाईल वापरताना डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
२०-२०-२० नियम पाळा : दर २० मिनिटांनी मोबाईलच्या स्क्रीनकडून नजर वळवून २० फूट अंतरावरच्या एखाद्या वस्तूकडे किमान २० सेकंद पहा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.
ब्राइटनेस योग्य ठेवा: मोबाईलची ब्राइटनेस लेव्हल खूप जास्त किंवा खूप कमी ठेवू नका. वातावरणानुसार ब्राइटनेस अॅडजस्ट करा.
ब्लू लाईट फिल्टर वापरा : मोबाईलमध्ये “Blue Light Filter” किंवा “Night Mode” ऑन करा. हे डोळ्यांना होणारा त्रास कमी करते.
मोबाईल डोळ्यांपासून दूर ठेवा: मोबाईल डोळ्यांच्या खूप जवळ धरून वापरू नका. किमान ३०-३५ सें.मी. अंतर ठेवून स्क्रीनकडे पहा.
जास्त वेळ सलग वापर टाळा: मोबाईल सतत तासन्तास पाहणे टाळा. मध्ये मध्ये ब्रेक घ्या.
डोळ्यांना पाणी शिंपडा: डोळे कोरडे पडल्यास थंड पाण्याने शिंपडल्याने आराम मिळतो.
योग्य झोप घ्या: दररोज किमान ७-८ तास झोप घेतल्यास डोळ्यांना ताजेतवाने वाटते.
