सांगोला महाविद्यालय सांगोला येथे सहज ध्यान कार्यशाळा संपन्न

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे सांगोला महाविद्यालय सांगोला सहज योग ध्यान केंद्र, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी दिनांक २/११/२०२३ रोजी सहज ध्यान कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्जुन मासाळ यांचे हस्ते करण्यात आले. कार्यशाळेचे प्रस्ताविक प्रा. सदाशिव शिंदे यांनी केले. माता निर्मला देवी यांचे प्रेरणेतून सुरू असणारे सहज ध्यान केंद्र, पुणे यांनी ताण तणाव कमी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

सहज योगा परिचय, ध्यान याबाबत माहिती दिली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. विशाल कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. सदाशिव शिंदे यांनी मांडले. कार्यशाळेसाठी सौ. सौम्या हिंदुजा (दिल्ली), शौर्य (दिल्ली), इन्का मॅडम (दिल्ली), श्री. माळी सर, श्री. शिरसागर सर, श्री, रायचुरे सर, प्रा. कुलकर्णी, प्रा. लवटे. प्रा. पाटील. प्रा. जुंदळे, प्रा. शेख, प्रा. कु. पवार, प्रा. होनराव, प्रा.बडवे, श्री. काशीद, श्री. खंदारे आदी उपस्थित होते. सहभागी विद्यार्थी, कर्मचारी यांनी याचा लाभ घेतला कार्यशाळेसाठी २०० लोक सहभागी होते.