दत्तात्रय मिरजकर पतसंस्थेस ६५ लाखाचा ढोबळ नफा

दत्तात्रय मिरजकर (आण्णा) नागरी सह. पतसंस्थेची २०२४- २५ या आर्थिक वर्षात कर्ज वसुली ९२ टक्के इतकी झाली असून संस्थेस ६५ लाख १२ हजार इतका ढोबळ नफा (profit) झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे मिरजकर यांनी दिली.

यावेळी संस्थेचे चेअरमन प्रकाश गोरे, व्हा. चेअरमन सौ. अश्विनी शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, संस्थेचे भागभांडवल ९३ लाख ३३ हजार, निधी ९४ लाख ४० हजार, ठेवी ८ कोटी १८ लाख, कर्ज वाटप ७ कोटी १० लाख गुंतवणूक ३ कोटी २७ लाख, सीडी रेषो ६८.३८ टक्के, कर्ज वसुली ९२ टक्के असून संस्थेचे संपूर्ण कामकाज संगणकाव्दारे केले जाते व एसएमएस सुविधा दिली जात असून आरटीजीएस व एनईएफटी मासिक ठेव योजना सुविधा सुरू आहे. दिवंगत माजीआमदार विलासराव शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्या सहकार्यातून संस्थेची वाटचाल सुरू आहे.