अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र सर्वांच्याच माहितीचे आहे. काही भागात रस्ते इतके खराब झाले आहेत कि ज्यामुळे वाहनधारकांसह पादचारी यांनादेखील खूपच त्रास सहन करावा लागतो आहे. सांगोला ते कडलास या रस्त्याची अवस्था खूपच खराब झालेली आहे. त्यामुळे नागरिकांमधून रस्ता दुरुस्थीची मागणी केली जात होती. कडलास दरम्यान माणनदीवरील रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने करण्यासाठी कडलास नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. याप्रकरणात लक्ष देत आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित रस्ते विकास अधिकारी यांना सदर सूचना दिल्या, प्रशासन दखल घेत कामाला सुरुवात केली.
रस्त्ये कामाला सुरुवात झाल्याने वाहन धारकातून समाधान व्यक्त केले जात आहे . रस्ते दुरुस्तीचे निवेदन मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी कडलास ग्रामस्थांनी तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी दत्तात्रय जाधव, नितीन गव्हाणे, समाधान पवार, निलेश अनुसे, अक्षय लवटे, अरुण वाघमोडे, विकास ननवरे, अजित गायकवाड, दत्तात्रय टापरे, कुमार चव्हाण, दिपक गायकवाड, सुनिल लेंडवे, गणेश गायकवाड, संग्राम गायकवाड, पांडूरंग ऐवळे, अमरसिंह महांकाळ, केशव गायकवाड, बाळासो आवताडे, समाधान जावीर, आबा ननवरे, भिमराव गडहिरे, उपस्थित होते.
दि. २ एप्रिल २०२४ रोजी निवेदन देवून सांगोला – कडलास रोडवरील असणाऱ्या माणनदीच्या पुलावरती रास्ता रोको आंदोलन केले होते. या दरम्यान ग्रामस्थांवर रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी गु.र.नं. ४२५ / २०२४ नुसार गुन्हे दाखल झालेले होते आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या हस्तक्षेप मुळे कडलास ग्रामस्थांवरील आंदोलनाचे गुन्हे माघारी घेण्यात आले.
