विट्यातील अनिल बाबर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

येथील विटा नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल म. बाबर (Anil M. Babar) यांना  राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती, बेळगावीतर्फे राष्ट्रीय आदर्श सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा गोवा येथे नुकताच संपन्न झाला. विटा येथील माजी नगरसेवक अनिल बाबर हे गेल्या २५ ते ३० वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शहरातील गोरगरिबांची सेवा करत असतात. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक  शासकीय व निमशासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल  राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती, बेळगावीतर्फे राष्ट्रीय आदर्श सामाजिक  सेवा गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी  अरविंद पट्टी यांच्या हस्ते मानचिन्ह आणि शाल श्रीफळ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुमार लोटके, दत्तात्रय तारळकर आणि मनोज खारगे उपस्थित होते. या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असून आगामी काळात आणखी जोमाने सामाजिक कार्यात सक्रिय राहू, असे मत अनिल बाबर यांनी व्यक्त केले आहे.