शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील विधानसभा जागांचे वाटप निश्चित झाल्याच्या चर्चा आहेत.
तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असून खानापूर, आटपाडी व मिरज मतदारसंघ उबाठा शिवसेनेच्या वाट्याला गेल्या ची माहिती आहे. या मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची चर्चा जरी होत असली तरी ते लोकसभेची निवडणूक झाल्यामुळे लगेच विधानसभेला इच्छुक नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.
खानापूर आटपाडी मतदार संघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते तर मिरजमधून प्राध्यापक सिद्धार्थ जाधव किंवा तानाजी सातपुते यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करून तसा ठराव जिल्हा कार्यकारिणीने वरिष्ठांकडे पाठवला आहे.