३८ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. सोलापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.डी. मुथप्पा यांनी सांगोला महाविद्यालयास भेट दिली. त्यांनी महाविद्यालयाची व एन.सी.सी. विभागाची पाहणी केली. महाविद्यालयाच्या एन.सी.सी. छात्रांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत केले. यावेळी संस्थेचे सचिव म.सि. झिरपे सर व प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश भोसले, कॅप्टन संतोष कांबळे व कार्यालयीन अधीक्षक श्री. पी. एस. शिंदे उपस्थित होते. कर्नल एम. डी. थप्पा यांनी एन.सी.सी. छात्रांशी संवाद साधला व छात्रांना मार्गदर्शन केले.
त्यांनी ३८ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. सोलापूरचे कमांडिंग ऑफिसर म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्या निमिताने त्यांनी महाविद्यालयास व एन.सी.सी. विभागास भेट दिली. महाविद्यालयातील ग्रंथालय, संगणक विभाग, क्रीडा विभाग व एन.सी.सी. कार्यालयास भेट देऊन महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांचे कौतुक केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी कर्नल एम. डी. मुथप्पा यांचे फेटा, शाल व बुके देऊन स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुनियर अंडर ऑफिसर प्रणाली सोळगे हिने मोलाचे सहकार्य केले. शिवाय सुभेदार मेजर ठाकूर सुभेदार वाघमारे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच एन.सी.सी. कंपनी कमांडर कॅप्टन संतोष कांबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन केले. या कार्यक्रमाप्रसंगी एन.सी.सी. चे सर्व छात्र उपस्थित होते.