मान्सूनचे पहिले अडीच महिने संपलेत. मान्सूनचा आता फक्त दीड महिन्यांचा काळ बाकी आहे. यंदा मान्सूनच्या अगदी सुरुवातीला, जून महिन्यात मोसमी पावसाचे प्रमाण फारच कमी पाहायला मिळाले.पंजाबरावं डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 19 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे.
12 ऑगस्ट पासून ते 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या सूर्यदर्शनाची शक्यता आहे. या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे ढगाळ हवामान राहणार नाही असा अंदाज आहे.
राज्यातील कोकण विभागात आणि खानदेश, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागात 17 ऑगस्ट पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र 20 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर म्हणजेच कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. याचा परिणाम म्हणून कर्नाटकात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे.