सांगोला एसटी आगाराकडून विविध देवदर्शन ग्रुप सहलींचे आयोजन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सांगोला आगाराकडून श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील विविध देवस्थानच्या नागरिक, भाविकांच्या देवदर्शन सहलीचे आयोजन करण्याची सुविधा केली आहे. तसेच यासाठी शासनाच्या ज्येष्ठ नागरिक, महिला सवलत योजनेचा लाभ सुरूच राहणार असून याचा नागरिकांनी, महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख विकास पोफळे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर विभागातील सांगोला आगारांकडून श्रावण महिन्यात आपल्या लालपरी सोबत विविध देवदर्शन मोहीम सुरू केली आहे.

यामध्ये पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोटसाठी पूर्ण तिकीट ६४०, अर्धे ३२०, अष्टविनायक दर्शन मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली दोन दिवस पूर्ण तिकीट १६०० रुपये, अर्धे ८००, कोल्हापूर, मार्लेश्वर पूर्ण तिकीट ९५०, अर्धे तिकीट ४७५, कोल्हापूर, मार्लेश्वर, गणपतीपुळे दोन दिवस पूर्ण तिकीट ११००, अर्धे तिकीट ५५०, शिखर शिंगणापूर, गोंदावले पूर्ण तिकीट ५००, अर्धे तिकीट २५०, शनी शिंगणापूर, शिर्डी, त्र्यंबकेश्वर, पंचवटी दर्शन दोन दिवसअष्टविनायक दर्शन पूर्ण तिकीट . १५००, अर्धे तिकीट ७५० अशा सहलींचे आयोजन केले आहे. याबाबत नागरिकांनी सुखरूप प्रवासासाठी, प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन सांगोला आगार कटिबद्ध आहे.