आज सांगोल्यात आ. गोपीचंद पडळकर यांची बैठक!

सहा तारखेला होणाऱ्या पंढरपूर येथे ओबीसी महामेळाव्याच्या नियोजनासाठी सांगोल्यात आज बैठक घेण्यात येणार आहे. महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी ओबीसी समाज बांधवांची हॉटेल ब्लू डायमंड येथे बैठक होणार आहे.

दुपारी ठीक एक वाजता नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये आ. गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन श्री बाळासाहेब एरंडे, श्री परमेश्वर कोळेकर, श्री शिवाजी नाना बनकर, श्री मारुती आबा बनकर, श्री आनंदा माने, श्री बिरुदेव शिंगाडे, दत्तात्रय जानकर, श्री दत्ता चव्हाण, मधुकर बनसोडे, सोमनाथ गवळी, संतोष करांडे यांनी केल आहे.