महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून श्रावण महिन्यात धार्मिक क्षेत्रांना जाण्यासाठी सवलतीच्या दरात इचलकरंजी आगाराकडून स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये महिला जेष्ठ नागरिक व प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात ७५ रुपयापासून ८५० रुपयापर्यंत जाऊन येण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार – इचलकरंजी मारलेश्वर व इचलकरंजी न रामलिंग खिद्रापूर अशी बस सेवा असणार आहे.
मंगळवार इचलकरंजी-गणपतपुळे, इचलकरंजी-पंढरपूर-तुळजापूर प्रवाशांच्या सोयीसाठी इच्छुक प्रवाशांनी आपल्या गावातून धार्मिक ठिकाणी ग्रुप, कुटुंब यांच्यासाठी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या धार्मिक तीर्थक्षेत्र सहलीचा सवलतीच्या दरातील लाभ प्रवाशांनी घ्यावा. सुकन्या मानकर, वरिष्ठ आगार व्यवस्थापक
बुधवार इचलकरंजी-पंढरपूर. गुरुवार इचलकरंजी- नृसिंहवाडी- औदुंबर,
शुक्रवार इचलकरंजी-पंढरपूर- तुळजापूर,
शनिवार इचलकरंजी ते अकरा मारुती दर्शन,
रविवार इचलकरंजी ११ मारुती दर्शन व इचलकरंजी- जोतिबा आदमापूर अशा बस सेवा सुरु रहाणार आहेत.