प्रत्येक भागात अनेक जागृत देवस्थान असतात. त्यांच्या यात्रा देखील दरवर्षी भरविल्या जातात. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यामध्ये आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील सिद्धनाथ देवस्थान खूपच प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान या देवस्थानचा समावेश शक्तिपीठ महामार्गामध्ये करण्यात यावा अशी मागणी भाजप युवा मोर्चा खानापूर आटपाडी विधानसभा प्रमुख प्रणव गुरव यांनी केली आहे. खरसुंडी देवस्थान हे मानदेशातील महत्त्वाचे देवस्थान आहे.
दररोज हजारो भाविक भक्त देवाच्या दर्शनासाठी येतात वर्षातून दोन मोठ्या यात्रा या ठिकाणी भरतात यात्रेकरिता महाराष्ट्र व कर्नाटक मधून लाखो भाविक भक्त येतात यांची सोय होण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान पैकी एक असणारे खरसुंडी देवस्थान शक्तिपीठ महामार्गाला जोडण्यात यावे अशी अनेक भाविक भक्तांची इच्छा आहे हा शक्तिपीठ महामार्ग होण्यासाठी मुख्यमंत्री पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन प्रणव गुरव यांनी केले आहे.