इचलकरंजीत ७८वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा!

आज ७८वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. इचलकरंजी शहरांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी शासकीय कार्यालय, महाविद्यालय, शाळा, पोलीस ठाणे, सर्व राजकीय पक्ष कार्यालयामध्ये झेंडावंदन करण्यात आले. यावेळी शहरांमध्ये बाईक रॅली, सायकल रॅली काढण्यात आली.

आज इचलकरंजी शहरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच माजी सैनिकांना मानवंदना देण्यात आली.

अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निखेश घाटमोडे पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी डीवायएसपी समीरसिंह साळवे तसेच चारही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच काँग्रेस कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संजय कांबळे, शशांक बावसकर यांनी मानवंदना दिली. राष्ट्रवादी अजित पवार गट कार्यालयामध्ये सुद्धा ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विठ्ठल चोपडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यालयामध्ये यावेळी सागर चाळके, मदन कारंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

तसेच मनसे कार्यालयामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रताप पाटील, शहाजी भोसले, रवी गोंदकर यांनी मानवंदना दिली. तसेच ताराराणी पक्ष कार्यालयामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच राहुल आवाडे यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली.

शिवसेना शिंदे गट मातोश्री येथे ध्वजवंदन करून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी मानवंदना दिली. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे राजाराम ग्राउंड येथे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास आजी-माजी सैनिकांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती.