मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा जनसंवाद गावभेट दौरा ग्रामीण भागामध्ये तुफान लोकप्रिय ठरलेला आहे. सांगोला तालुक्यातील अनेक गावातील वाड्यावस्त्यांवर जाऊन शेकडो प्रश्नांचा त्यांनी जागेवरच निपटारा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद देखील मिळत आहे.
सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्यावस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा या जाणून घेतलेल्या नाहीत. गाव खेड्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या अडचणी किंवा व्यथा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी राजकीय इतिहासात प्रथमच मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी प्रत्यक्ष वाड्यावस्त्यांवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच अनेक अडचणी दूर देखील केलेल्या आहेत. अनेक समस्या त्यांच्या मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दौऱ्यादरम्यान सोडवल्यामुळे चांगलेच त्यांचे कौतुक होऊ लागले आहे.
आमचं कोणतंही काम असेल तर आम्ही आजपर्यंत नेत्यांच्या दारात जात होतो अशावेळी तालुक्याचा नेता आम्हाला त्यांच्या सोयीने वेळ देत होता आणि त्यांना सवड मिळाली तर ते आमच्या अडचणी जाणून घेत होते. पण शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे टोक असलेल्या नराळे, हवीसेवाडी सारख्या छोट्याशा वाड्यावस्त्यांवर येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणाऱ्या मा. आम.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमच पक्क ठरलेले आहे अशी भावना नराळे येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.