वारणावती (ता. शिराळा) येथील वसाहतीमध्ये आज रात्री साडेआठच्या सुमारास भल्या मोठ्या अजगराचे दर्शन झाले. परिसरातील काही युवकांना अजगर निदर्शनास येताच त्यांनी सर्पमित्र तसेच वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.त्यानंतर तब्बल अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर या अजगराला पकडण्यात यश आले.
साधारण ११ फूट लांब व ६० ते ७० किलो वजनाचा हा भला मोठा अजगर आढळल्याने भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिनाभरापूर्वी करमणूक केंद्राजवळ भल्यामोठ्या अजगराचे दर्शन झाले होतं. त्यामुळे हे अजगर तोच आहे की दुसरा याबाबत मात्र स्पष्ट समजू शकले नाही. वन्यजींवच्या ताब्यात सध्या हा अजगर असून त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी रात्री उशिरा कर्मचारी रवाना झाले.