आटपाडी तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे. किरण शेंडगे राहणार शेंडगेवाडी, लॉज व्यवस्थापक रिंकू यादव व पांडुरंग यमगर, सुभाष यमगर दोघे राहणार बनपुरी या चौघांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या चौघांना सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पीडित मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता लॉज व्यवस्थापक व संशयित तिथे आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.