हातकणंगलेत भरणार नागावच्या श्री खणाई देवीची यात्रा

सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी दि. २० ऑगस्ट रोजी नागाव, ता. हातकणंगले येथे श्री खनाईदेवीची यात्रा मोठया उत्साहात संपन्न होत आहे. यात्रा मंगळवार व बुधवार अशी दोन दिवस भरणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवारी असून सकाळी मान सवाल, त्यानंतर पूजा अभिषेक घातला जातो. दुपारी ३ वाजता देवीची पालखी निघून संपुर्ण गावात प्रदक्षिणा घातली जाते.

सायंकाळी ४ वाजता जंगी नामवंत मल्लांचे कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. रात्रौ ९ वाजता करमणुकीचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा आयोजित केला आहे. बुधवारी रात्रौ ९ वाजता सुप्रसिद्ध लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बुधवारी सकाळी ठिक ९ वाजता घोडागाडी व बैलगाडी शर्यती शासनाच्या नियमानुसार होणार आहेत. सर्व गावकऱ्यांनी यात्रा उत्साहात व शांततेत पार पाडावी असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष सतीश लंबे यानी केले