लांबच लांब रांगा, किमान दरात मिळणारं गहू- तांदूळ इतकंच काय तर अगदी केरोसिन आणि डाळी आणि या साऱ्याचा लाभ घेण्यासाठी रेशनच्या दुकानाबाहेर असणारी लांबच लांब रांग अनेकांनीच पाहिली असेल.अशा या रेशनच्या दुकानांचा आणि तिथं मिळणाऱ्या गोष्टींचा चेहरामोहरा बदलणार असून, या वस्तूंच्या यादीत आणखी भर पडणार आहे.
केंद्र सरकारकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत रेशन दुकानधारकांना अनुदानित अन्नधान्यांसोबतच त्यांच्या उत्पादनांमध्ये विविधता आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं आता या दुकानांमध्ये बाजरी, विविध प्रकारच्या डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या सामानाचीही विक्री केली जाणार आहे. ज्यामुळं रेशन दुकानधाकरांनाही अर्थार्जनाचा नवा स्त्रोत उपलब्ध असेल.