सोन्या-चांदीच्या भावात घसरण, धनत्रयोदशीपूर्वी खरेदीची संधी

दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण दीपावली आधी देशभर १० नोव्हेंबर (शुक्रवारी) रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. या दिवशी सोने खरेदी शुभ मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांनी उंच उडी घेतली असून सणाच्या दिवशी मौल्यवान धातूच्या दरात दिलासा अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीपण सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे कारण धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतीत काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्या-चांदीत दिलासा
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि १० ग्रॅम सोन्याची किंमत ६१,६४० रुपयांवर स्थिर राहिली. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव कालच्या ५६,५०० रुपये इतकाच आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि एक किलो चांदीची ७५,००० रुपयांवर खरेदी-विक्री होत आहे.सोन्या-चांदीचे वायदेही घसरले
या आठवड्यात सोन्या-चांदीच्या फ्युचर्सच्या किमतीतही नरमाई दिसून आली. दोन्ही मौल्यवान धातूच्या फ्युचर्स किमती आज घसरणीसह उघडल्या. सोन्याचे फ्युचर्स ६१ हजार रुपयांच्या खाली आलेत, तर चांदीचे फ्युचर्स ७२ हजार रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे वायदे वाढीसह उघडले, पण नंतर त्यातही घसरण दिसू लागली.