राज्यातील १०० शाळांमधून कोल्हापूर जिल्ह्यातील रयत गुरूकुल सर्वोत्तम शाळा ठरली आहे. महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या ‘पीएलसी’ स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. पहिल्या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन करण्यात आला. निवडक विद्याथ्र्यांना ‘महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर’ आयडेंटीटी कार्डने गौरवण्यात आले. रयत गुरुकुलच्या वेदांत पाटील (खोची), विराज हेरवाडे (दुधगाव), सोहम कुलकर्णी (कुंभोज), इंद्रजित शिंदे (कुंभोज आदी विद्याथ्र्यांनी पालक तुषार शिंगे, मुख्याध्यापक सागर पंडित माने यांनी हा पुरस्कार स्विकारला. यशस्वीतेसाठी शाळा समन्वयक संगीता चंदोबा व प्रकल्प समन्वयक माधुरी केडगे यांच्यासह सर्व वर्ग शिक्षक नियमित मार्गदर्शन देत होते. रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी, रयतचे संघटक डॉ. अनिल पाटील, स्कूल चेअरमन अजित पाटील, को-ऑर्डिनेटर ए. बी. पाटील, संचालक सुभाष मसुटगे, विभागीय चेअरमन एम. बी. शेख, विभागीय अधिकारी विनयकुमार हनशी यांनी स्वच्छता अभियानातील यशाबद्दल अभिनंदन केले.
६४ हजार शाळांची सहभागाची नोंदणी
प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा. कारण ह्या प्रकल्पात विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंवा संदेश दे श देणारे दूत नसून कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत. प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. ६४ हजार शाळांची सहभागाची नोंदणी झाली आणि विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि • बेफिकीर थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते.
महाराष्ट्र निष्काळजी मुक्त बनेल
विद्यार्थ्यांने ‘गांधीगिरी करत इतराने केलेली घाण साफ करणे अपेक्षित नसून, लेट्स चेंज फिल्म मधील ‘सरदार पटेलबाजी करत पाण करणाऱ्यालाच साफ करायला विनंती करणे अपेक्षित आहे. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंव्हा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना मजा येते. आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर व्हिडीओ करून सोशल मीडियावर शेअर करणे त्यांच्या आवडीचे काम बनून जाते. पहिल्या टप्प्यात • असे १५ लाखांहून अधिक विडिओ शेअर झाले आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी प्रस्तावित केलेल्या संकल्पनेला गती मिळालेली आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर गिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित होणार आहे.