आष्ट्यात शिवजयंतीस शिवरायांचा पुतळा उभारणार

आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत समितीच्यावतीने बसवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी दिली .वैभव शिंदे म्हणाले, आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा ही माजी आमदार विलासराव शिंदे यांची इच्छा होती, त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय पुतळा समितीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे यांना अध्यक्ष करण्यात आले.

सर्वपक्षीय आंदोलनानंत आमदार जयंत पाटील जिल्हाधिकारी यांची चर्चा झाल्यानंतर ही जागा पालिकेकडे वर्ग केल खासदार धैर्यशील माने यांनी अकर लाखांचा निधी दिला. विशाल शिंदे म्हणाले, मुख्याधिकाऱ्यांसोबतच चर्चा झाली. चबुतऱ्याबाबत ठराव झाल आहे. पुतळ्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यावेळी वीर कुदळे, प्रकाः मिरजकर, दीपक मेथे, अर्जुन माने यांन मनोगत व्यक्त केले.