आष्टा येथील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये इतिहास विभागाच्या वतीने उद्या रविवारी 6 तारखे रोजी आधुनिक महाराष्ट्राच्या निर्माते : लोकनेते राजा रामबापु पाटील या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चेसत्राचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी दिली. कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव, प्राचार्य आर.डी सावंत यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे .शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे .जेष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे या कार्यक्रमासाठी बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत .या चर्चेसत्राठी 120 शोधनिबंधक आले आहेत. या चर्चासत्रात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जीवनातील विविध पैलूवंर विस्तृत चर्चा होणार असून तरुण पिढीला बापूचे कार्य समजावे, त्यांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी म्हणून हा प्रयत्न केल्याची माहिती प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी दिली.
Related Posts
भाजपाकडून माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची मोफत सोय……..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिना…
अजित पवारांच्या सभांचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही जयंत पाटलांचा दावा…..
राज्याचं लक्ष लागलेल्या इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघात यंदा लक्षवेधी लढत होणार आहे. सातवेळा निवडून आलेले जयंत पाटील यंदा आठव्यांदा निवडणुकीला सामोरं…
आष्ट्याजवळ भीषण अपघात…..
अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात खूपच वाढ होत आहे. असाच एक भीषण अपघात आष्टा इस्लामपूर मार्गावर झाला आहे. यामध्ये तरून जागीच…