मुख्यमंत्र्यांसोबत राहूल आवाडे यांचा विमानप्रवास

काही दिवसांपूर्वी राहूल आवाडे हे विधानसभा निवडणूकीत उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार आवाडे यांनी केली होती. कोल्हापूर येथील कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते. इचलकरंजी राहूल आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासमवेत कोल्हापूर ते मुंबई असा विमान प्रवास केला. या प्रवासादरम्यान जिल्ह्यातील राजकारणाबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

या कार्यक्रमाला आमदार प्रकाश आवाडे, राहूल आवाडे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर गुरुवारी सांयकाळी सर्वजण विमानतळावर आल्यानंतर राहूल आवाडे हे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत विमानातून मुंबईकडे रवाना झाले. या प्रवासात राजकीय परिस्थीतीवर चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.