बँक खात्यात पैसे आले नाही? लाडक्या बहिणींनो ‘इथे’ नोंदवा आपली तक्रार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या योजनेच्या अतंर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.

या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काही महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीयेत. अशा परिस्थितीत नेमके काय करावे? तक्रार कुठे करावी? असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात येत आहेत. जाणून घेऊयात याबाबत अधिक माहिती…

फॉर्म भरल्यानंतरही पैसे न आल्यास काय करावे?

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे किंवा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व 1) महिला 2) समूह संसाधन व्यक्ती 3) बचत गट अध्यक्ष 4) बचतगट सचिव 5) गृहिणी 6) अंगणवाडी सेविका/मदतनीस 7) ग्रामसेवक 8) वॉर्ड अधिकारी 9) सेतू 10) बालवाडी सेविका 11) आशा सेविका

12) पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) 13) CMM2 14) मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात आले आहे की, नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता.

त्यामुळे Approved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुद्धा पाहता येतील.सर्व संबंधितांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल, याची नोंद घ्यावी.

कुठे तक्रार करावी?

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा नंबर 98617 17171 हा आहे. या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करुन आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क केल्यास तुम्हाला खालील प्रश्न विचारण्यात येतील.सर्वप्रथम तुम्हाला आपली भाषा निवडण्याचा पर्याय येईल.पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडा.कृपया तुमचा जिल्हा निवडापुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदारसंघ निवडाकृपया तुमचे वय निवडायोजनेची निवड करामग तुम्ही लाडकी बहीण योजना निवडल्यास तुम्हाला “जर तुम्हाला अर्ज भरण्यात काही अडचण येत असेल, तर खालील ‘मदत’ या बटणावर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधा. राष्ट्रवादी पक्ष लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल.असा मेसेज येईल.