बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फॅशन सेन्स आणि नवनवीन ड्रेसिंग स्टाइलमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ५० व्या वर्षी देखील मलायका अरोरा खूपच सुंदर आणि हॉट दिसते. या वयातही ती बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींना टक्कर देते.
मलायका अरोरा आता चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या नव्या फोटोशूटमुळे. मलायकाचे हे फोटो पाहून सर्वांना धक्का बसला. मलायकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडत आहेत. पण दुसरीकडे या फोटोंमुळे ती ट्रोल होत आहे. हे फोटो पाहून नेटिझन्स मलायकाची तुलना उर्फी जावेदसोबत करत आहेत.
मलायका अरोरा कॅमेऱ्यासमोर आतापर्यंतच्या सर्वात हॉट लूकमध्ये दिसली. मलायका या फोटोंमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये मलायका अरोराने निऑन रंगाचा श्रग घातला आहे. अभिनेत्रीने हे श्रग समोरच्या बाजूने उघडे ठेवले आहे. मलायकाने वेगवेगळ्या रंगाच्या चमकत्या टिकल्यांनी तयार केलेला स्कर्ट घातला आहे. मलायका या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

फोटोंमध्ये मलायका तिचा बोल्ड लूक दाखवत आहे. तिने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. मलायकाने या नव्या ड्रेसिंग स्टाइलमध्ये समोरच्या बाजूने आपले शरीर कसेतरी झाकले असल्याचे दिसत आहे. मलायकाने या लूकचा फोटो शेअर करताच लोकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. मलायकाने आपला लूक परिपूर्ण करण्यासाठी केस कलर केले आहेत. त्याचसोबत तिने निऑन कलरचे हिल्स कॅरी केले आहेत.
मलायकाने हे फोटोशूट अमित अग्रवालसाठी केले आहे. तिच्या या फोटोंना १ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक केले आहे. तर अनेक युजर्सने तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अनेकांनी तिची तुलना उर्फीसोबत केली असून तिला उर्फीची बहीण म्हणत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘म्हणून मलाही फोटोग्राफर बनायचे आहे.’ दुसर्याने लिहिले की, ‘द नेक्स्ट उर्फी.’ तिसऱ्याने लिहिले की, ‘उर्फीची नवीन बहीण.’ चौथ्या युजरने लिहिले की, ‘उर्फीसुद्धा हिच्यासमोर अपयशी ठरली.’
