आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री स्वतःच्या कर्तृत्ववार असामान्य कार्य करीत असुन संधी मिळाल्यास स्त्रिया त्या क्षेत्रात सोनं करतात असे मतः सीमाताई परिचारक यांनी व्यक्त केले. त्या जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अजित रामचंद्र जगताप यांच्या संकल्पनेतून मंगळवेढा शहरात नव्याने सुरू झालेल्या समृद्धी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा उदघाटन समारंभ प्रसंगी बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी मधुमती दिपकआबा साळुंखे पाटील होत्या
. सुरवातीस मधुमती साळुंखे-पाटील व सीमाताई परिचारक यांच्या हस्ते पतसंस्थेचे उदघाटन करण्यात आले यावेळी परिचारक पुढे म्हणाल्या स्त्री सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी या सर्वच भूमिका पार पाडत असते. स्व सुधाकरपंत परिचारक यांनी सहकाराच्या माध्यमातून खूप भरीव काम केले आहे. अन् मोडकळीस आलेल्या संस्थाना ऊर्जितावस्था मिळाली आहे. समृद्धी पतसंस्थेच्या माध्यमातून देखील विश्वासाहर्ता निर्माण करून छोट्या मोठ्या उद्योगांना निश्चितच चालना मिळणार आहे. असे सांगून पतसंस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा. शोभा काळुंगे, प्रणिता भालके, शैलजा सावंत, आशा नागणे, निला आटकळे, मनिषा जाधव, शुभदा पटवर्धन, निर्मला माळी, हर्षदा सुरवसे, विजया देशमुख, श्रद्धा पवार, प्रा. धनश्री कापशीकर, आरती पुजारी, जयश्री हावनाळे, अरुणा दत्तू लक्ष्मीबाई वाकडे, साहेरा काझी, अपर्णा हजारे, चेअरमन आशादेवी जगताप, व्हाईस चेअरमन कोमल शिंदे, सल्लागार सुप्रिया जगताप यांचेसह सर्व संचालक मंडळ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी शक्तीचे नावच नारी आहे या विषयावरती डॉ प्रिती शिंदे कोल्हापूर यांनी आपल्या व्याख्यानातून स्त्री सामर्थ्याची ओळख करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर आभार संचालिका रूपाली कलुबर्मे यांनी मानले.