डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना अखेर यश!

सांगोला तालुक्यातील मेथवडे, मांजरी, पिरजादे वस्ती, माळी वस्ती येथील नागरीकांना , विद्यार्थ्यांना सांगोला येथे जाण्या-येण्या साठी कुठलीही एस.टी.बस सेवा नसल्याने शालेय विद्यार्थी, वयोवृध्द नागरीक व महिला यांची अतिशय गैरसोय होत असल्याने मेथवडे गावातील नागरीक एस.टी सेवा सुरु करावी म्हणुन अनेक दिवस मागणी करीत होते. मेथवडे ग्रामस्थांनी संबंधीत सांगोला आगार प्रमुखांना एस टी सेवा सुरु करण्याबाबत डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन सुध्दा दिले होते.

पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनीही आगार प्रमुखांना नागीकांच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळोवेळी लक्षात आणुन दिल्या होत्या. बाबासाहेब देशमुख व ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन समंधीत आगार प्रमुखांनी मेथवडे गावला एस टी सुरु करण्याचा निर्णय घेतला आसुन सोमवार दिनांक २६/८/२०२४ रोजी सकाळी ६-३० वाजता नवीन सुरु करण्यात आलेल्या एस टी चे बसचे पुजन व एस.टी बसच्या चालक व वाहक यांचा सत्कार पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असुन एस.टी बस सेवा नागरीकांसाठी सज्ज झाली आहे. सांगोला मेथवडे एस. टी. सकाळी ६-०० वाजता सांगोल्यातुन निघणार असुन ती एस.टी बस सकाळी ६-३० वाजता मेथवड्यात पोहचेल व लगेचच सांगोल्याला जाण्यासाठी माघारी फिरेल.

नंतर सांगोल्यातुन दुपारी १२-३० वाजता पुंन्हा निघून १-०० वाजता मेथवडे येथे पोहचणार व लगेचच पुंन्हा सांगोल्याला परत जाणार आहे आशा प्रकारचे नव्याने सुरु करण्यात आलेल्या एस.टी.बसचे वेळापत्रक आहे यांची नोंद नागरीकांनी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. सदर एस.टी सेवा सुरु झाल्याने मेथवडे, मांजरी, पिरजादे वस्ती, माळी वस्ती येथील नागरीकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसुन येत आसुन बाबासाहेब देशमुख यांच्या कामाचे कौतुक सुध्दा होताना दिसत आहे.