सांगोला नगरपरिषदेची ऐतिहासिक देखणी इमारत इतिहास जमा….

सांगोला सुमारे 45 वर्षांपूर्वीची सांगोला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सांगोला नगर परिषदेचे ऐतिहासिक देखणी वास्तू इमारत पाडल्यामुळे इतिहास जमा झाली आहे. तर आता त्या जागेवर नगर विकास विभागाकडून मंजूर झालेल्या सुमारे 15 कोटी मंजूर निधीतून सुसज्ज अशी चार मजली सांगोला नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. त्यामुळे सांगोला शहराच्या वैभववात आणखी एक भर पडणार आहे.

सांगोला नगरपालिकेची स्थापना 1855 सालातील असून महाराष्ट्रातील क वर्गातील नगरपरिषद म्हणून ती ओळखली जाते. पूर्वी नगरपरिषदेचे कार्यालय महात्मा फुले भाजी मंडई शेजारील वेशीच्या वरच्या बाजूला होते. त्यावेळी दैनंदिन कामकाजाला जागा कमी पडू लागली होती. सन 1975 साली लोकनियुक्त नगराध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरातील नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी सोयीच्या दृष्टीने त्याकाळी सुमारे तीन लाख रुपये निधीतून सण 1976 -77 साली इमारतीचे बांधकाम सुरू केलं.

एक वर्षात ते पूर्ण केलं व 15 ऑगस्ट 1979 ते 80 स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लोकनियुक्त नगराध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. दरम्यान काळात दुसरा मजला त्यानंतर तिसरा मजला तीन मजली इमारत बांधकामाचा विस्तार होत गेला. 40 ते 45 वर्षापासून नगरपरिषदेचे कामकाज यास इमारतीमधून चालत होते.

मात्र प्रशासनाकडून सण 2021 साली स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये नगरपरिषद इमारत जीर्ण निकृष्ट झाल्याचं अहवालाच म्हटलं होतं. तर दिवसेंदिवस सांगोला शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधा पुरवण्यासाठी व विविध वाढीव कक्षांची गरज वाढत गेली होती. आमदार शहाजी बापू पाटील यांनी सन 2023 मध्ये नगर विकास विभागाकडून सुमारे 12 कोटी रुपये निधी नवीन प्रशासकी इमारत बांधकामासाठी तर सुमारे तीन कोटी रुपये निधी संरक्षण भिंतीसह इतर कामासाठी मंजूर करून आणला.

सदर मंजूर निधीतून अत्याधुनिक सर्व सोयी सुविधा चार मजली अशी नगर परिषदेची प्रशासकीय इमारत बांधले जाणार आहे. परिषदेच्या इमारतीचे तांत्रिक महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं होतं सदर इमारत वापरणे योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाची जागा पूर्ववत करून घेतली जाणार आहे. लवकरच निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्षात बांधकामाचा सुरुवात होईल व त्या ठिकाणी सुमारे 15 कोटी मंजूर निधीतून सुसज्ज अशी चार मजली इमारतीची इमारत वास्तू नगर परिषदेची ही वास्तू उभारली जाणार असल्याची सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सुधीर गवळी यांनी ही माहिती दिली आहे.