सांगोला तालुक्यात कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके ४३ वा.स्मृतीसमारोह विविध कार्यक्रमांनी होणार संपन्न

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे शिक्षणमहर्षि व सांगोला,नाझरा,कोळा विद्यामंदिर प्रशालेचे जनक कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४३ वा.स्मृतीसमारोह २०२४ विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये दि.३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ रोजी पुरूषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा संपन्न होणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन माढा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांचे शुभहस्ते, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांचे प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वा.सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे संपन्न होणार आहे. तसेच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी सायं.५.००वा. रायफल शूटिंग ऑलिंपिक पद विजेते स्वप्नील कुसाळे यांचे शुभहस्ते, प्रांताधिकारी मंगळवेढा बी.आर.माळी यांचे अध्यक्षतेखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा विक्रांत गायकवाड, तहसीलदार संतोष कणसे, पोलिस निरीक्षक भिमराव खणदाळे यांचे सन्माननीय उपस्थितीत संपन्न होणार आहे.

रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह सांगता समारंभ प्रमुख पाहुणे डॉ.विठ्ठल लहाने प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन,लातूर यांचे शुभहस्ते व संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या समारंभामध्ये कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे.व सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.समाधी दर्शन व ८.०० वा.सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे कै.बापूसाहेब झपके यांचे तैलचित्रास पुष्पहार समर्पित करण्यात येणार आहे.