सांगोला तालुका पावसाळी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

सांगोला तालुका पावसाळी हॉलीबॉल मुलांच्या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा संकुल सांगोला येथे संपन्न झाले . या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी १४ वर्षाखालील मुले, पाच संघ १७ वर्षाखालील मुले, ११ संघ १९ वर्षाखालील मुले, तीन संघ तसेच १४ वर्षाखालील मुली, चार संघ १७ वर्षाखालील मुली चार संघ व १९ वर्षांखालील मुलींचे दोन संघ, अशा पद्धतीने तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे. आज गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांमध्ये या स्पर्धा पार पाडल्या जाणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन माझी तालुका संयोजक चारुदत्त जगताप सर तसेच डिकसळ आश्रम शाळेचे क्रीडा शिक्षक भारत यादव सर, या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी हॉलीबॉल स्पर्धाप्रमुख श्री भारत इंगवले सर, संयोजक श्री शहाजी घाडगे सर तसेच सिंहगड कॅम्पसच्या कॅम्पस डायरेक्टर श्री अशोक नवले सर, विद्या मंदिर प्रशाला चे क्रीडा शिक्षक डी के पाटील सर, अजनाळे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक येलपले सर, कोळवले सर, सिंहगडचे आरिफ तांबोळी सर, हंगरगेचे भंडे सर, राजुरी हायस्कूलचे भिवरे सर, श्रीधर नाझरा कन्या प्रशालेचे क्रीडाशिक्षक व कीडभिसरीचे क्रीडा शिक्षक घेरडे सर इत्यादी शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच श्री दया गस्ते सर. श्री संतोष लवटे सर, श्री सुभाष निंबाळकर सर, श्री भारत यादव सर, श्री गणेश पवार सर, श्री भारत इंगवले सर, श्री सतीश गेजगे सर व इतर शिक्षकांनी काम पाहिले.

१४ वर्षाखालील मुलांचा आश्रम शाळा डिस्कळ संघांनी विजय प्राप्त केला व उपविजयी संघ सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर. १७ वर्षाखालील मुलांमध्ये अंतिम सामना सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर विरुद्ध विकास विद्यालय अजनाळे या संघात झाला. यामध्ये सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर यांनी हा सामना जिंकला तर १९ वर्षाखालील मुलांमध्ये सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर विरुद्ध सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. यामध्ये सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर यांनी हा सामना जिंकला. अशा पद्धतीने आज सामने पार पाडण्यात आले. सर्व सामने पार पाडण्यासाठी तालुक्यातून आलेल्या क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केल्याबद्दल स्पर्धा स्पर्धाप्रमुख भारत इंगवले सर यांनी सर्वांचे आभार मानले.