नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर (2024) देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले असले तरी, यावेळी भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीसंदर्भात अजूनही चर्चा होताना दिसते.
यातच आता, पाच वर्षांनंतर, म्हणजेच 2029 मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इशाऱ्या-इशाऱ्यात’ म्हटले आहे की, आपण 2029 मध्ये सलग चौथ्यांदा सत्तेत येणार आहोत.
पाच वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार स्थापन होईल. ते मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, हा पाचवा फिनटेक फेस्ट आहे आणि पाच वर्षांनंतर होणाऱ्या दहाव्या फिनटेक फेस्टसाठीही आपण येणार.
अर्थात पंतप्रधान मोदी यांनी संकेत दिले आहे की, पाच वर्षांनंतरही केंद्रात त्यांचेच सरकार असेल आणि ते पंतप्रधान म्हणून फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील. एढेच नाही, तर आमचे बेस्ट समोर येणे अद्याप बाकी आहे, असेही मोद यांनी म्हटले आहे. भाजप नेते संबित पात्रा यांनी आपल्या एक्स अकाउंटवर PM मोदींचा यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.