Zika Virus : झिकाने वाढविली डोकेदुखी! राज्यात १२७, तर….

पुणे – पाषाण परिसरातील एका गर्भवती महिलेला झिका विषाणूच्या संसर्गाचे निदान सोमवारी (ता. २) झाले. त्यामुळे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या ९८ पर्यंत वाढली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.राज्यातील रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.

आजपर्यंत राज्यात झिकाचे १२७ रुग्ण आढळले, त्यात ६३ गर्भवतींचा समावेश आहे. पुण्यात झिका रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.पाषाण परिसरात राहाणाऱ्या महिलेचे वय ३५ असून ३५ आठवड्यांच्या गर्भवती आहेत. त्यांना अंगदुखी आणि सर्दीची ठळक लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासासाठी घेतले होते.

आतापर्यंत एरंडवणे, मुंढवा, डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बुद्रूक, खराडी आणि कळस भागांत रुग्ण आढळले आहेत. त्यात ४५ गर्भवतींचा समावेश आहे. गर्भवतींचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.