उद्धव ठाकरे यांनी दोस्तीचा हात दिला तर काय करणार? देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता संमेलन कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर रोखठोक उत्तरे दिली. यावेळी त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोस्तीचा हात मिळवायला आले तर काय निर्णय घेणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. दोस्ती करायची आहे हे उद्धव ठाकरेंनीच विचारलं पाहिजे. ते माझं अस्तित्व संपवायला निघाले आहेत. माझं अस्तित्व संपवण्यास निघालेला व्यक्ती माझ्याशी दोस्ती करेल का.

राजकारणात जर तरला जागा नसते. वास्तव हे वास्तव आहे. त्यावेळी काय होतं यावर परिस्थिती निर्भर असते अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांना तुम्हीच विरोधकांच्या रडावर का? असादेखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. कारण भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजवर टीका केली तर पक्ष कमजोर होईल. त्यामुळे मला टार्गेट केलं जातं. माझ्यावरच विरोधकांची तोफ धडाडते. मला अभिमन्यू सारखं घेरलं जातं. पण मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्र तोडून यायचं मला माहीत आहे. मी तोडू शकतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.