सांगोल्यात अपहारप्रकरणी पोलीस फौजदार यांच्यावर गुन्हा दाखल……

अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रामध्ये भरपूरच वाढ झालेली आहे. खून, मारामारी, लाचलुचपत अशा अनेक घटना आपल्या कानावर सतत पडत असतात. सांगोला पोलीस ठाण्यातील तत्कालीन मुद्देमाल नगदी कारकून सहाय्यक पोलीस फौजदार अब्दुल लतिफ अमरुद्दिन मुजावर यांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची 7 लाख 85 हजार 969 रुपयाची रक्कम शासनास जमा न करता स्वतःच्या आर्थिक फायदयाकरिता स्वतःकडे ठेवून अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी फरार असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे करीत आहेत. दरम्यान आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून त्याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.ज्यांच्याकडे रक्षणाची जबाबदारी असते त्यांनीच जप्त मुद्देमालावर डल्ला मारल्यामुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती रुजली आहेत हे दिसून येते.