सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अनेक नेते मंडळींची उमेदवारीसाठी धडपड सुरू झालेली पाहायला मिळत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात देखील आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हे देखील आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांच्या सांगोला तालुक्यातील गावभेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला आहे.
सांगोला तालुक्यातील दीपकआबा साळुंखे पाटील यांचे चिरंजीव आणि सांगोला तालुक्याचे आश्वासक युवा नेतृत्व यशराजे साळुंखे पाटील यांनी भारतातील क्रमांक एकचे विद्यापीठ असलेल्या सिम्बॉयसिस या विद्यापीठातून वकिलीची एल.एल.बी पदवी प्राप्त केलेली आहे. सिम्बॉयसिस इंटरनॅशनल लॉ कॉलेजचा दीक्षांत समारोह अर्थात पदवी प्रदान सोहळा पुणे येथे पार पडला.
यावेळी त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. एलएलबी चे शिक्षण पूर्ण करत असताना यशराज साळुंखे पाटील यांनी सदैव स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या अनुपस्थितीत सांगोला तालुक्यातील त्यांची धुरा सक्षमपणे सांभाळत शिक्षणाकडे त्यांनी अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही. अत्यंत कमी वयात सांगोला तालुक्यातील राजकारण आणि समाजकारण यामध्ये आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवून यशराज साळुंखे पाटील यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण केले. यामुळे सांगोला तालुक्यात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सध्या होत आहे.
