पावणेदोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या सांगलीच्या पंचायतन गणेशोत्सवाचा एक भाग असलेल्या चोर गणपतीचे आगमन बुधवारी झाले. विधिवत पूजा करुन त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त पंचायतन गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे.चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी ही चोर गणपतीची परंपरा सुरू केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या या पर्यावरणपूरक ‘चोर गणपती’चे अत्यंत गुपचूपपणे मंदिरात आगमन होते. या गणपतीची प्रतिष्ठापना गुपचूपपणे होत असल्याने याला चोर गणपती म्हटले जाते.
मंदिरातील पंचायतन संस्थान गणेशोत्सवाची सुरुवात ‘चोर गणपती’च्या आगमनाने होते. मंदिरातील गाभाऱ्यात ही गणपतीची मूर्ती विधिपूर्वक बसविली जाते.सांगलीच्या राजवाडा दरबार हॉलमध्ये पंचायतन गणपपती संस्थान ट्रस्टतर्फे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांची सुरुवात ५ सप्टेंबरपासून होणार आहे. त्यामुळे याठिकाणी सुंदर आरास करण्यात आली आहे. सांगलीचे गणपती मंदिरही सजविण्यात आले असून याठिकाणी भाविकांची गर्दी होत आहे.