विधानसभेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षामध्ये जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून ९० ते १०० जागांवर लढण्याची तयारी सुरु झाली आहे.
सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.सूत्रांनी सांगितल्यानुसार, शरद पवार गट ९० ते १०० जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून १०० च्या जवळपास जागांसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.
पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा आणि बूथ कमिट्या तयार करा अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमलेल्या निरीक्षकांची झूम मीटिंग झाली होती. यामध्ये यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. गणपती उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.